Kishori Pendekar Team Lokshahi
राजकारण

आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर, आम्हाला काय जमीन दाखवणार पेडणेकरांचे शाहांना प्रत्युत्तर

अमित शाह हे केंद्रीय नेते,त्यांनी 150 चा नारा देणं म्हणजे आमची कॉपी

Published by : Sagar Pradhan

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी 'मिशन मुंबई' वर लक्ष केंद्रित केले आहे. शाह यांच्या उपस्थिती आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावर आता मुंबई माजी महापौर, शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको

किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देतांना म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रथम 150 चा नारा दिला आहे. अमित शाह हे केंद्रीय नेते आहेत, त्यांनी 150 चा नारा देणं म्हणजे आमची कॉपी आहे. शिवाय धोके कोण कोणाला देत आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वजण पाहात आहेत. मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको आहेत. आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार, तुम्ही आस्मानात आहात ते आम्ही तुम्हाल जमिनीवर आणू, लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू असा इशारा शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमित शाह यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.

काय केली होती अमित शाह यांनी टीका?

अमित शाह उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. 2014 साली दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. राजकारणात जो धोका सहन करतो, तो कधीच मजबूत होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी पाठीत सुरा खुपसला. जनमताचा अपमान केला हे मुद्दे सांगण्यासाठी आता संकोच नको. कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र, आपल्या घरासमोर कानाखाली मारली. तर तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जातो. आता उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवण्याची वेळ आली आहे. शिंदे सरकार हीच खरी शिवसेना आहे, अशा शब्दांत त्यांनी उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले असून कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा