PM Modi | BMC Team Lokshahi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी फुंकले मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग; फडणवीसांचीही मुंबईकरांना हाक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून मुंबई महापालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मुंबईमधील प्रकल्प वेगाने तेव्हाच होऊ शकतात. जेव्हा स्थानिक प्रतिसाद मिळेल, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांना साद घातली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

मधल्या काळात डबल इंजिन सरकार नसल्याने प्रत्येक कामात खोडा घातला गेला, अशी टीका पंतप्रधानांनी महाविकास आघाडीवर केली आहे. परंतु, मुंबईला भविष्यासाठी तयार करणे ही डबल इंजिन सरकारची जबाबदारी आहे. आधुनिक सुविधा, स्वच्छतेचा अनुभव सर्वसामान्यांना डबल इंजिन सरकार देतेय. याआधी या सुविधा फक्त श्रीमंतांच्या दारात होत्या. मुंबईचे रस्ते सुधारण्यासाठी जे काम सुरु होतेय ते डबल इंजिन ते काम अधोरेखित करत आहे

मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमी नाही, मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी लागला पाहिजे. हा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला गेला, बँकांच्या तिजोरीमध्ये ठेवला गेला. विकासाची काम रोखण्याची प्रवृत्ती असेल, तर मुंबईचं भविष्य उज्ज्वल कसं होणार? असा सवाल पंतप्रधानांनी विचारला. विकासासाठी मुंबईकर व्याकुळ राहता कामा नये. अशी परिस्थिती बदलत्या भारतात आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात होता कामा नये.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत मदतीची गरज आहे. मी तुमच्यासोबत उभा आहे. हे माझे वचन आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आलो आहे. छोट्या-छोट्या लोकांच्या पुरुषार्थाने नव्या उंचावर पोहचणार आहे. मी सर्व मुंबईकरांना विकास कार्यासाठी धन्यवाद देतो. शिंदे व फडणवीस सरकारची जोडी तुमचे सर्व स्वप्न साकार करतील हा माझा विश्वास आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे.

तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मुंबईत रोज हजारो-करोडो लिटर पाणी कुठलीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडत होते. 20-25 वर्ष ज्यांनी महापालिकेत सत्ता गाजवली त्यांनी केवळ स्वतःच घरं भरलं, अशी जोरदार टीका फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली आहे. मुंबईची जनतेचा आज आशीर्वाद मागत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा