राजकारण

मराठा आरक्षणावर माझ्याकडे उपाय, पण या चोरांना तो सांगणार नाही; आंबेडकरांचे टीकास्त्र

प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहे. तसेच, मराठा आरक्षणावरही भाष्य केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जळगाव : नरेंद्र मोदी म्हणजे देशाला एक प्रचंड मोठा धोका असल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. तर, मराठा आरक्षणाबाबत उपाय माझ्याकडे आहे पण या चोरांना मी तो सांगणार नाही, अशीही टीका आंबेडकरांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे असं वाटतच नाही. विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हे समजत नाहीये. ज्या प्रश्नाचं महत्व नाही त्याचीच चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहात दिसत नाही. दिल्लीत संसदमध्ये बेरोजगार तरुणाने उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न देखील उचलला गेला नाही. ग्रामीण सह शहरी भागात कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

आरक्षणाचं नेमक काय करावं हे सरकारला समजत नाहीये. आगामी निवडणुकीत आमदार-खासदार बदलले गेले पाहिजे म्हणजे नव्या जोमाने काम सुरू होतील. मराठा आरक्षणाबाबत उपाय माझ्याकडे आहे पण या चोरांना मी तो सांगणार नाही. सांगितला तर ते खोबरं करुन टाकतील. ते मी नवीन राज्यकर्ते आले त्यांना आरक्षणाबाबत सल्ला देईल, अशी टीका त्यांनी केली आहे. पाकिस्तान आणि मनमोहन सिंग म्हणजेच जरांगे आणि भुजबळ, असा ही निशाणा आंबेडकरांनी दोघांवर साधला.

नरेंद्र मोदी म्हणजे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे. मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यात वर्षभरात कधी कुठे आणि किती वेळा भेट झाली हे भागवतांनी जाहीर करावं, असे आवाहन त्यांनी केले आहे. मध्यप्रदेशात महिलांसाठी असलेली योजनेमुळे त्या ठिकाणी पुन्हा भाजप आली. तरी ईव्हीएम संदर्भात मी कोर्टात जाणार आहे, असेही आंबेडकरांनी सांगितले.

दरम्यान, आमचं जसं नाव आहे त्याच प्रमाणे आहोत. इंडिया आघाडीच्या बैठकीत निमंत्रण आलं तर बैठकीला जाणार मात्र अजून निमंत्रण आलेलं नाही. आगामी निवडणुकीत आघाडी होईल तर आघाडीच्या निर्णयानुसार लोकसभेसाठी तयारी करू, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?