राजकारण

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात जनसभांना संबोधित करून अनेक ठिकाणी रोड शो, रॅली करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Published by : Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात जनसभांना संबोधित करून अनेक ठिकाणी रोड शो, रॅली करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

दिंडोरी आणि कल्याण येथे एका सभेला संबोधित केल्यानंतर आज उत्तर पूर्व मुंबई येथे एक रोड शो करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे आणि पालघर या मतदारसंघात या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

18 मे रोजी या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होणार असल्याने प्रचाराला वेग आला आहे. भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, दुपारी पंतप्रधान मोदी दिंडोरी येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी कल्याण येथे प्रचारसभा घेणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात