राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जे सोबत आहेत, त्यांना सोबत घेऊन ताकदीने आम्ही भाजपविरोधात लढा देणार आहोत. राष्ट्रवादीचा काही गट अनेक दिवसांपासून भाजपशी बोलणे करत होता. याबाबत असं काहीतरी घडतंय, याची पूर्ण कल्पना होती. ते आज घडलेलं आहे.
तसेच लोकांना गद्दारी अजिबात आवडत नाही. जे भाजपसोबत गेले आहेत, त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे. त्यांना योग्य जागा कळेल,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.