Prithviraj Chavan Team Lokshahi
राजकारण

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन

भिडेंच्या वक्तव्याचा मुद्दा पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा विधिमंडळात मांडला. या रागातून चव्हाण यांना हा धमकीचा फोन करण्यात आला आहे.

Published by : Sagar Pradhan

कराड : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापलेय. यासोबतच त्यांच्या वक्तव्याचे आता राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा मुद्दा हा विधिमंडळात मांडला. याच रागातून पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन आला आहे.

राज्यातील विविध ठिकाणासह भिडेंच्या वक्तव्याचे विधिमंडळातही पडसाद पाहायला मिळाले. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा विधिमंडळात मांडला. याच रागातून आता चव्हाण यांना धमकीचा फोन करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. या धमकी प्रकरणी कराड पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा