राजकारण

Ajit Pawar : एकाच खुर्चीवर दोघांचे डोळे कसे असणार?

पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Published by : Siddhi Naringrekar

पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील काही मंत्री देखील उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री यांची पण या कार्यक्रमाला यायची इच्छा होती. मुख्यमंत्री आजारी आहे म्हणून आले नाही. मी आणि देवेंद्र फडणवीसजी शेजारी बसलो तर लगेच काय झालं. मी मीटिंग घेतली तर काय बिघडलं. मुख्यमंत्री एक पद वेगळं आहे. पण ते आज झालेले विरोधी पक्ष म्हणाले कोल्डवॉर. असे म्हणत अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.

तसेच ते पुढे म्हणाले की, आणि एकाला वाटतेय की या दोघांचा डोळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहे. अरे आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर दोघांचा तिथे डोळा ठेऊन कसं काय चालेल आणि ती खुर्ची भरलेली आहे ना? व्यक्ती बसलेली आहे. मला हे खर काढायचं नव्हत पणं तुमच्याकडे दुसरी पणं बाजू समोर यायल हवी म्हणून मी बोललो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."