थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rahul Gandhi) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जांगासाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मनसेला सोबत घेण्यासाठी राहुल गांधींनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे. राज्यात महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार आहेत. महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक असल्याची माहिती मिळत असून जिथे जिथे शक्य होईल तिथे मनसे महाविकास आघाडी सोबत लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summery
मनसेला सोबत घेण्यासाठी राहुल गांधींचा ग्रीन सिग्नल
राज्यात महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार
महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक