लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्यात अनेक आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस सदस्यांनी त्यांना दोन मिनिटे मोन राहून श्रद्धांजली वाहिली. त्यावर लोकसभेच्या सभापतींनी सभागृहाच्या नियमांचे स्मरण करून दिले.
राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवातच शेतकरी आंदोलनापासून केली. त्यावर काही भाजपा सदस्यांनी आक्षेप घेतला. पण राहुल गांधी यांनी हाच मुद्दा लावून धरला आणि भाषणाच्या अखेरीस या आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळत उभे राहण्याचे आवाहन केले. त्यावरून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. सभागृहाच्या प्रतिष्ठेचे जतन आणि नियमांचे पालन करण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या कोणताही सदस्य सांगेल की, उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहायची आहे. तर ते योग्य ठरणार नाही. अशा रीतीने हा पायंडाच पडेल, असे बिर्ला म्हणाले.