मुंबई : शिंदे गटाच्या 16 आमदर अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी आठवडभराचा वेळ दिला आहे. या सुनावणीनंतर राहुल नार्वेकरांनी महत्वाची माहिती दिली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, अथॉरिटी असल्यामुळे सुनावणी संदर्भात मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. परंतु, घटनेतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. सगळ्या 34 पिटीशनवर सुनावणी झाली आणि तारीख सांगितली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे पुढे काय होणार यची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
दरम्याान, शिंदे गटाचे वकिल अनिल सिंह यांनी माध्यमांना प्रतिकिया दिली. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेची प्रती आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. प्रभू यांच्याकडून सर्व केसेस एकत्र चालण्याकरीता अर्ज करण्यात आला आहे. यावर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला कागदपत्रे हस्तांतरीत करण्यासाठी वेळ दिला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.