राजकारण

MLA Disqualification : विधानसभा अध्यक्ष व ठाकरे गटाचे वकिलांमध्येच जुंपली, काय झालं नेमकं?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. दोन्ही गटाच्या वकिलांकडून सुनावणीवेळी जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. दोन्ही गटाच्या वकिलांकडून सुनावणीवेळी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. यावेळी अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे वकिल यांच्यात यांच्यात चांगलीच जुंपली. दरम्यान, या प्रकरणी आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरु होताच सुनील प्रभू यांना व्हिटनेस बॉक्समध्ये बसवले होते. २०१९ला शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस यांची युती झाली. प्रतिवादी पलिकडे आहेत. ते आमच्या सोबत मंत्री होते. विधानपरिषद निवडणुकीनंतर ती मंडळी गुवाहाटीला गेले. भाजपच्या दबाव तंत्रामुळे ते गेले म्हणून मी असे म्हंटले आहे, असा दावा सुनील प्रभूंनी यावेळी केला. यावर शिंदे गटाचे वकिल जेठमलानी यांनी आक्षेप घेत आपण या निष्कर्षापर्यंत आला आहात. मात्र आपल्याकडे ठोस पुरावे आहेत का? असा सवाल विचारला आहे. तसेच, आपण निवडून आलेले सदस्य आहात, ही बाब लक्षात घेता आपण एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे, असेही जेठमलानींनी म्हंटले आहे.

यावर सुनील प्रभूंनी देशाच्या संविधान व न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मी देशाचा नागरिक आहे. मी शपथ घेतली आहे त्यामुळे मी खोटे कधीच बोलणार नाही. मला संविधानाबद्दल आदर, प्रेम व आत्मियता आहे. अपमानित करणारे कृत्य माझ्याकडून होणार नाही. मी लोकशाहीचा आदर करतो. ही घटना इतकी बळकट आहे की घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे माझ्यासारखा एक सामान्य नागरिक आज आमदार झाला, असे त्यांनी म्हंटले आहे.

परंतु, आंबेडकरांचा उल्लेख विधानसभा अध्यक्षांनी रेकॉर्डवर न घेतल्यानं ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत आक्रमक झाले. कामत यांच्या भूमिकेनंतर अध्यक्षांनी प्रभू यांना तुम्हाला काही आक्षेप असेल तर मला सांगा. साक्षीदाराला प्रभावित करण्याचे काम वकिलांनी करू नये, असे म्हणत विधानसभा अध्यक्षांनी देवदत्त कामत यांना सुनाले. यावर कामत चांगलेच संतापले असून मी कुठल्याही प्रकारे साक्षीदारास प्रभावित करत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

अध्यक्ष तुम्ही मला चुकीचं ठरवत आहे. मी साक्षीदाराला भुलवण्याचा‌ प्रयत्न कधी केला नाही. २५ वर्षांच्या कारकिर्दीत ‌मी असं काही केलं नाही. सुनील प्रभू जे सांगतायत ते व्यवस्थित नोट केल जात नाही. प्रभू यांनी जबाब नोंदवताना बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊनही ते नमूद केलं गेलं नसल्याचा कामत यांनी आरोप केला आहे.

यावर अध्यक्षांनी कामत यांना प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले, प्रभू जे मराठीत बोलत आहेत, ते मी इंग्रजीत अनुवाद करत आहे. याशिवाय जेठमलानी यांचे इंग्रजी भाषेतील प्रश्न विचारल आहेत ते मी त्यांना मराठीत अनुवादित करून सांगत आहे. परिणामी प्रभू यांच्या साक्षीतील एखादा मुद्दा निसटला, तर तो त्यांनी मला सांगावा. अशी मुभा मी त्यांना दिली आहे. त्यामुळे उकर कुणीही त्यांच्या साक्षीदरम्यान लुडबुड केलेली मी खपवून घेणार नाही, असे नार्वेकरांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप