raj thackeray, devendra fadnavis Team Lokshahi
राजकारण

आज दोन सभा : राज ठाकरे औरंगाबादवरुन तर फडणवीस मुंबईवरुन ठाकरे सरकारला घेणार

देवेंद्र फडणवीस मुंबईतून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करणार

Published by : Team Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) शनिवारी पुण्यावरु औरंगाबादला पोहचले आहे. आता आज 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादेत तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची मुंबईत सभा होणार आहे. या दोन शहरांमधून ठाकरे सरकारचे हे दोन कट्टर विरोधक महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) घेरणार आहेत. भाजपने फडणवीस यांच्या सभेला बुस्टर डोस सभा असं टायटलं दिलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून भाजप कार्यकर्त्यांना बुस्टर देण्यात येणार आहे. भाजपच्या या सभेतून आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करणार आहे. त्याशिवाय या सभेतून भाजप महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सेनेची पोलखोल होणार

गेल्या काही दिवसात काळोखात मेट्रोच्या कारशेडच्या पत्र्याच्या मागे लपून दगड मारण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या पोलखोल सभेला घाबरून हे कृत्य केलं जात आहे. शिवसेनेचे कर्मकांड आम्ही जनतेसमोर आणले. काही लोक 14 मे रोजी सभा घेणार आहेत. कोणी 30 मे रोजी सभा घेणार आहेत. तर कोणी 1 मे रोजीच सभा घेत आहे. मात्र, भाजपची 1 मे रोजीची पोलखोल सभा सर्वात मोठी असणार आहे. या सभेतून देवेंद्र फडणवीस विरोधकांना डोस देतील. तसेच शिवसेनेची आम्ही पूर्णपणे पोलखोल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होत आहे. राज यांनी भोंगे काढण्यासाठी 3 मेचा अल्टीमेटम दिला आहे. यामुळे 1 मे रोजी ते काय बोलणार ? याकडे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं टोकचं पाऊल ! हातात चावी फिरवत आली आणि चौथ्या मजल्यावरून उडी मारली, Video Viral

Suryakumar Yadav Viral Video : "मॅनेजर बोला तो..." सूर्यकुमार यादवसह 'या' महिला क्रिकेटपटूने केला व्हायरल ट्रेंड फॉलो

Manikrao Kokate : राजीनाम्याचं संकट असताना माणिकराव कोकाटेंचं शनिमंदिरात साकडं

Maharashtra Rain : पुढील काही तास महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना तातडीचा रेड अलर्ट