राजकारण

Raj Thackeray : जे खोके खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर

मनसेने आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याच्या आयोजन केले होते.

Published by : Siddhi Naringrekar

मनसेने आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याच्या आयोजन केले होते. या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, खड्ड्यातून गेलो काय आणि खड्यात गेलो काय? महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का या लोकांना एकदा धडा शिकवावा घरी बसवावं. मुंबई नाशिकहून येताना ८-८ तास लागतात. स्त्रीयांचे तर सर्वांत मोठे हाल होतात.

तसेच मला अजून नाही कळलं, आपलं यान चंद्रावर जाऊ शकतं पण रस्ते चांगले होऊ शकत नाहीत. ला अजून कळलं नाही चांद्रयान जे गेलंय चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला? तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता. कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या, कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत. कुंपण शेत खातंय. असे राज ठाकरे म्हणाले.

 तुम्ही रस्ते बांधायला आणि टोल उभे करायला शिका. मला असं वाटतं भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायचंही शिकावं. हे जे आज एकमेकांवर ओरडत आहेत ना खोके खोके त्यांच्याकडे कंटेनर आहेत. त्यांनी तर कोविड पण सोडला नाही. असे राज ठाकरे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा