राजकारण

टायगर अभी जिंदा है! मनसेचे नवे स्फुर्तीगीत प्रदर्शित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये धडाडणार होणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये धडाडणार होणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, याआधी मनसेचे स्फुर्ती गीताचा प्रदर्शित झाला आहे.

मनसेच्या ट्विटर अकाउंटवरुन हे स्फुर्तीगीत प्रदर्शित करण्यात आले आहे. या स्फुर्तीगीताच्या सुरुवातीलाच टायगर अभी जिंदा है हा डायलॉग ऐकू येतो. करू तयारी रे…घेऊ भरारी रे.. राजमुद्राही मिरवूया.., असे गाणे शब्दबद्ध करण्यात आले आहेत. तसेच गुढी उभारू नवनिर्माणाची.. मनामनात निनादणार मनसे स्फुर्तीगीत, असेही या व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे. मनसेचे हे नवे स्फुर्तीगीत आज सभेच्या आधी निनादणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेचे आतापर्यंत तीन टीझर रिलीज करण्यात आले आहे. या सभेची जय्यत तयारी शिवतीर्थावर सुरु असून महाराष्ट्रभरातून मनसैनिक रवाना झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असे लिहिण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप