राजकारण

महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील झाला ‘दिगू टिपणीस’; राज ठाकरेंचा निशाणा

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालेला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला, अशा शब्दात राज ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच. तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.

ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जे आमदार आज शपधविधी घेत आहेत तसेच सत्तेत सहभागी होत आहेत त्यांची ती वैयक्तिक भूमिका आहे. पक्षासोबत या घडामोडींचा काहीच संबंध नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा