मनसेने आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याच्या आयोजन केले होते. या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, खड्ड्यातून गेलो काय आणि खड्यात गेलो काय? महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का या लोकांना एकदा धडा शिकवावा घरी बसवावं. मुंबई नाशिकहून येताना ८-८ तास लागतात. स्त्रीयांचे तर सर्वांत मोठे हाल होतात.
तसेच मला अजून नाही कळलं, आपलं यान चंद्रावर जाऊ शकतं पण रस्ते चांगले होऊ शकत नाहीत. स्त्रीयांचे तर सर्वांत मोठे हाल होतात. पण काही नाही, चिंता नाही. हाल झाले तर झाले पण आम्ही तुम्हालाच मतदान करू. मला अजून कळलं नाही चांद्रयान जे गेलंय चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला? तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता. राज्यात कोकणाचं नाही तर नाशिकच्या रस्त्याला पण खड्डे आहेत. २००७ – ०८ साली या रस्त्याचं काम सुरू झालं. काँग्रेसचं सरकार, शिवेसना भाजपा सरकार आलं, मग कोणकोणाचं सरकार आलं. त्याला ना आकार ना उकार. असे राज ठाकरे म्हणाले.