Raj Thackeray  Team Lokshahi
राजकारण

ही कीड समूळ नष्टच करा, पुणे प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

केंद्र व राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

Published by : Sagar Pradhan

एनआयए, ईडी-सीबीआय आणि पोलिसांनी त्यांच्या संस्थेविरुद्ध नुकत्याच टाकलेल्या छाप्यांविरोधात पीएफआय कॅडर एकत्र आले होते. आंदोलना दरम्यान, शुक्रवारी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांकडून 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर राज्यभर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.त्यावर विविध नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे. त्यावरच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे राज ठाकरे यांच्या पत्रात?

पुण्यातील घोषणाबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असे पत्र त्यांनी ट्विटवर शेअर केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन