राजकारण

...पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही लक्ष असेल हे विसरू नका; राज ठाकरेंचा इशारा

मराठी पाट्या येत्या दोन महिन्यात लावण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मराठी पाट्या येत्या दोन महिन्यात लावण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले असून प्रतिक्रिया दिली आहे. दुकानदारांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत, असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. 'मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत, अशा सूचनाही राज ठाकरेंनी मनसेसैनिकांना दिल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

kareena kapoor : “प्राडा नाही तर माझी अस्सलं…” करिना कपूरने कोल्हापुरी चप्पल घालत शेअर केला 'तो' फोटो

Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; आता मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे

Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर अजुनही प्रश्नचिन्ह? मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट