Raj Thackeray  Team Lokshahi
राजकारण

अंधेरी निवडणुकीत माघार घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार; म्हणाले, उमद्या राजकीय...

भाजपच्या या माघारीनंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं असून त्यांनी फडणवीस आणि भाजपचे आभार मानले आहेत. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे निवडणूक लढण्याच्या मताचे होते.

Published by : Sagar Pradhan

काल अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असून ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यावरच आता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आभार मानण्यासाठी पत्र लिहले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे पत्रात?

काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व)च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार, अश्या शब्दात त्यांनी भाजपचे आभार मानले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं