(Raj Thackeray - Uddhav Thackeray ) राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे. ही विजयी सभा 5 तारखेला होणार आहे. या मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या विजयी मेळाव्याचे विजयी मेळाव्याचं आणखी एक निमंत्रण समोर आलं आहे. ठाकरे बंधूंचं जनतेला विजयी मेळाव्याचं एकत्र निमंत्रण पाहायला मिळत आहे.
या निमंत्रण पत्रिकेमध्ये 'इतिहास साक्ष आहे. मराठी माणसावर झालेल्या प्रत्येक अन्यायावर वार करत, आपण नेहमीच आपला आवाज बुलंद केलाय. 'हिंदीसक्ती' विरोधात उभारलेल्या लढ्यामध्ये ह्याच बुलंद आवाजाची प्रचिती पुन्हा एकदा आली.
आपण एकत्र आहोत म्हणून सरकारला माघार घ्यावी लागली. मराठी माणसाची एकजूट जिंकली! चला, हा विजयी क्षण साजरा करूया, आवर्जून उपस्थित रहा!' असे या निमंत्रण पत्रिकेमध्ये लिहिण्यात आले आहे. या मेळाव्यातून राज ठाकरे, उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.