थोडक्यात
दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंना मोठा धक्का
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आ. राजन तेली शिंदेंसोबत
शिवसेनेच्या मेळाव्यात केला पक्षप्रवेश
(Rajan Teli ) काल सर्वत्र दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर काल एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. दसऱ्याच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोरेगाव नेस्को सेंटर येथील एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात राजन तेली यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
राजन तेली यांनी विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. दीपक केसरकर यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजन तेली यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.