राजकारण

Rajasthan Election Results : राजस्थानात अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई; यंदा जनतेचा कौल कोणाला?

राजस्थानची निवडणूक ही मुख्यत्वे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Rajasthan Election Results : राजस्थानची निवडणूक ही मुख्यत्वे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. यावेळी राजस्थान काँग्रेसला थोडं कठीण असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात उभे असलेले बंडखोर आणि सचिन पायलट यांच्या नाराजीची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागण्याची शक्यता आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं लोकसभेची सेमीफायनल असल्याचं सांगण्यात येतंय. लोकसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या निवडणुकीत राजस्थानच्या मतदारांच्या मनात काय आहे हे मतपेटीतून दिसणार आहे. यावेळची राजस्थानची निवडणूक ही मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. काँग्रेसची संपूर्ण मदार अशोक गेहलोत यांच्यावर असणार आहे. राजस्थानातल्या 199 जागांपैकी शंभर जागा जिंकण्याचं लक्ष्य अशोक गेहलोत यांच्यासमोर असणार आहे.

पोलपंडितांनी यावेळी राजस्थान काँग्रेसला थोडं कठीण असल्याचं सांगितलंय. तरीही काँग्रेसच्या जागा 90च्या घरात असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात उभे असलेले बंडखोर आणि सचिन पायलट यांच्या नाराजीची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागण्याची शक्यता आहे. तरीही राजस्थानातील जनता काँग्रेसलाच हात देईल असा आशावाद काँग्रेसनं व्यक्त केला.

राजस्थान जिंकण्यासाठी भाजपने प्रचंड यंत्रणा त्या राज्यात वापरली. भाजपचा मायक्रो लेव्हलला प्रचार सुरु असतानाच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री राजस्थानातल्या गावागावांत प्रचार करत होते. चार केंद्रीय मंत्री आणि 18 खासदारांना भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. गेहलोत सरकारचा कारभार भ्रष्ट होता असा आरोप करत मतांचा जोगवा मागितला. पंतप्रधान मोदींनी सचिन पायलटांच्या काँग्रेसमधील मुस्कटदाबीचा मुद्दा पुढं करत भावनिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचं चित्र आहे.

राजस्थानमध्ये सलग दुसऱ्या वेळी कोणत्याही पक्षाला विधानसभेत विजय मिळालेला नाही. अशोक गेहलोत यावेळी ती परंपरा खंडीत करतात का हे पाहावं लागेल. दुसरीकडं भाजपच्या राजकारणातून काहीशा बाजुला पडलेल्या वसुंधराराजे शिंदे यांच्यासाठी कमबॅक म्हणून या निवडणुकीकडं पाहिलं जातं. राजस्थानातील लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये कोण जिंकतं कुणाला मात मिळते यावर लोकसभा निवडणुकीची गणितं ठरणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा