BJP vs Shivsena Team Lokshahi
राजकारण

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपची नवी खेळी, केंद्रातून...

चार राज्यांसाठी केले निरीक्षक नियुक्त

Published by : Jitendra Zavar

राज्यातील सर्वच पक्षांनी सध्या राज्यसभेच्या (rajya sabha election)उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मात्र शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. भाजपने अनिल बोंडे (Anil Bonde) आणि पियुष गोयल यांच्यानंतर धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांना आपला तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार व धनंजय महाडीक यांच्यात सामना रंगणार आहे.

शिवसेनेने येथे 2 उमेदवार उभे केले आहेत, ज्यासाठी त्यांना मित्र पक्ष आणि इतर अपक्ष उमेदवारांकडून 30 मतांची आवश्यकता आहे. भाजपकडे दोन उमेदवारानंतर तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपकडे 22 मते शिल्लक आहेत. दुसरीकडे अपक्ष आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची मते मते कमी झाल्यास सहाव्या जागेसाठी लढत रंगणार आहे.

बैष्णवकडे महाराष्ट्र

भाजपने आता राष्ट्रीय पातळीवरुन मोर्चाबांधनी सुरु केली आहे. राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन भाजपने येथे प्रभारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे राजस्थान, गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे हरियाणाची, अश्विनी वैष्णव यांच्याकडे महाराष्ट्र आणि जी किशन रेड्डी यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी, काँग्रेस आपल्या आमदारांना हरियाणा आणि राजस्थानमधील हॉटेलमध्ये हलवण्याच्या तयारीत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा