Rajya Sabha Elections Team Lokshahi
राजकारण

Rajya Sabha Elections : महाविकास आघाडी अन् भाजपने एकमेकांना दिला असा प्रस्ताव

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर खलबते सुरु झाले आहेत. आता पुढील दोन तासांत यासंदर्भात निर्णय होणार आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा (3 मे) दिवस महत्त्वाचा आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. यापुर्वी महाविकास आघाडीकडून अचानकपणे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई आणि सतेज पाटील हे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेट घेतली. (Rajyasabha Election 2022) या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत प्रचंड क्रॉस व्होटींग होते. यामुळे बिनविरोध निवडणुका घेण्याची परंपरा आहे. यामुळे आम्हाला राज्यसभेच्या तीन जागा मिळाव्यात. त्यानंतर विधान परिषदसाठी काही करता येईल, असा प्रस्ताव महाविकास आघाडीला भाजपने दिला. मविआने राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, आम्ही विधान परिषदेसाठी पाचवी जागा देऊ, असा प्रस्ताव दिला. या प्रस्ताव भाजपने नाकारला. आम्ही राष्ट्रीय पक्ष असून आमच्यासाठी राज्यसभेची निवडणूक महत्वाची आहे. तरीही हा प्रस्तावावर आम्ही पक्षात चर्चा करु, पक्षातील वरिष्ठांशी बोल, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. यामुळे राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर खलबते सुरु झाले आहेत. आता पुढील दोन तासांत यासंदर्भात निर्णय होणार आहे.

विधानपरिषदेवरील 10 आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे भुजबळ यांनी याच संबंधी फडणवीसांना ऑफर दिली. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध केल्यास विधानपरिषदेसाठी एक जागा आम्ही तुम्हाला देऊ, असं भुजबळ म्हणाले. त्यानंतर हीच ऑफर भाजपने महाविकास आघाडीला दिली. त्यानंतर

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना दिल्लीला फोन फिरवला आहे. दिल्लीतून निरोप येताच पुढच्या दीड तासात दोन्ही पक्षांची पुन्हा बैठक होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते देखील भुजबळ यांच्या बंगल्यावर चर्चेसाठी दाखल झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?