Ram Kadam  Team Lokshahi
राजकारण

मतदारसंघातील नागरिकांसाठी भाजप आमदार कदम यांची अनोखी प्रतिज्ञा; पाणी मिळेपर्यंत केस कापणार नाही...

मतदारांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, मतदारसंघातील डोंगराळ भागातील नागरिकांसाठी प्रतिज्ञा

Published by : Sagar Pradhan

नेहमी वेगवेगळ्या विषयावरून चर्चेत असणारे भाजप आमदार आता पुन्हा एकदा नव्या विषयावरून चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी एक अनोखी शपथ घेतली आहे. मतदारांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, अशी शपथ राम कदम यांनी घेतली आहे.

मतदारसंघातील डोंगराळ भागातील नागरिकांना जोपर्यंत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, असे ट्वीट त्यांनी केले आहे. या ट्वीटसोबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा एक फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांना देखील टॅग केले आहे.

घाटकोपर परिसरातील डोंगराळ भागात पाणी पुरवठा होत नसल्याने स्थानिक भाजपा आमदार राम कदम यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंगराळ भागातील नागरिकांना जोपर्यंत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही अशी अनोखी प्रतिज्ञा राम कदम यांनी घेतली आहे. पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून महापालिका अधिकाऱ्यांसोबत सातत्याने ते बैठका घेत आहेत. त्यामुळे घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न मार्गी लागणार का? आणि भाजपा आमदार राम कदम हे केस कटिंग करणार का? अशा विविध प्रश्न आता चर्चेला आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati Ganpati Visarjan : अमरावतीत गणपती विसर्जनाला गालबोट; 2 वेगवेगळ्या घटनेत नदीत बुडून दोघांचा मृत्यू

Amravati : Earthquake : तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी गावात भूकंपाचे धक्के

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 'लालबागच्या राजा'च्या विसर्जनास विलंब, समुद्राजवळ राजा थांबला... कसं होणार विसर्जन?

Latest Marathi News Update live : समुद्राला भरती आल्याने लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब