राजकारण

रामदास कदम गजानन किर्तीकर भेट; शिंदे गटातील प्रवेशाचा सस्पेंन्स कायम

राज्यात झालेला सत्ता बदल आणि त्यानंतर झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

लक्ष्मीकांत घोणसेपाटील | रत्नागिरी : राज्यात झालेला सत्ता बदल आणि त्यानंतर झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. नुकतीच रामदास कदम गजानन किर्तीकर यांच्यात भेट झाली. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले खासदार गजानन किर्तीकर सध्या कोणता झेंडा घेऊ हाती या विचारात आहेत का? असा प्रश्न पडतो.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले गजानन किर्तीकर स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी किर्तीकर यांनी यावेळी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. अगदी दसरा मेळाव्यावेळीही थेट माध्यमांकडेही किर्तीकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर मागील काही दिवसांपासून द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांनी गोरेगावच्या नेस्को मैदानात आणि शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, ती चूक पुन्हा नको, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर किर्तीकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतल्याने हा सस्पेंन्स वाढला आहे.

रामदास कदम हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांना पक्ष वाढीचे काम दिले गेले आहे. त्यामुळे रामदास कदम उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नाराज शिवसैनिकांना एकत्र करण्याचं काम सध्या करत आहेत. त्यामुळे रामदास कदम गजानन कीर्तिकर यांना एकनाथ शिंदे यांच्या गटात आणणार का याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

“चार दिवसांपूर्वी गजानन किर्तीकर माझ्याकडे आले होते. मराठी माणसाला नोकरी देण्यासाठी गजानन किर्तीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची साथ सोडत, भाजपाबरोबर युती करावी. बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधातील भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडावी. गजानन किर्तीकर शिंदे गटात आले, तर त्यांचं स्वागत आहे,” असेही रामदास कदम यांनी म्हटलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या