राजकारण

शिवसेनेला धक्का! रामदास कदम यांचा राजीनामा; शिंदे गटात जाणार?

Ramdas Kadam यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) आक्रमक नेते म्हणून ओळख असणारे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, योगेश कदम यांनी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडत आधीच एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले होते.

रामदास कदम मागील काही वर्षांपासून शिवसेनेवर नाराज होते. अनिल परब यांच्याविषयी कदम यांचा कार्यकर्त्यासोबतचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर शिवसेनेने रामदास कदमांना माध्यमांशी संवाद न साधण्याचा आदेश दिला होता. तसेच, रामदास कदम व त्यांचा मुलगा योगेश कदम यांना वेळोवेळी शिवसेनेकडून डावलण्यात येत असल्याने ते शिवसेनेत अस्वस्थ होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही. शिवसेनेत घुसमट होत असून पक्षासाठी काम करता येत नसेल तर नेतेपदाचा काय उपयोग, असे म्हणून रामदास कदम यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, योगेश कदम यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडत आधीच एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले होते. या पार्श्वभूमीवर रामदास कदम शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, रामदास कदम यांनी मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र, मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे, असे म्हणत चर्चांना पूर्णविराम लावला होता. पण, आता शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदमही शिंदे गटाची वाट धरणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Latest Marathi News Update live : एक रोमांचक सोहळा महाराष्ट्र अनुभवणार आहे, संजय राऊतांचं प्रतिपादन

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी