राजकारण

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीयवाद-अस्पृश्यता मानत नाही'

मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संस्थापक इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य; राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नालस्कर | नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातिवाद अस्पृश्यता मानत नाही, इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संस्थापक इंद्रेश कुमार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातिवाद अस्पृश्यता मानत नाही, असे वक्तव्य शहरातील पारडी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल शिशु विजयादशमी उत्सव साजरा झाला. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या बाल स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिकेत प्रस्तुत केली. याच कार्यक्रमात मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संस्थापक इंद्रेश कुमार हे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

इंद्रेश कुमार म्हणाले की, प्रत्येक जातीचा सन्मान व्हायला हवा. अस्पृश्यता हे पाप आहे. हा गुन्हा आहे जो अस्पृश्यता मानेल तो मागे राहतो. मोठे व्हायचे असल्यास अस्पृश्यता सोडावी लागेल. अस्पृश्यता जातीभेद, धर्मांतरण या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला. धर्मांतरऐवजी प्रत्येक धर्माचा सन्मान करायला हवा. धर्मांतरण हे असंविधानिक कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपल्या धर्माचे पालन करा. पण, दुसऱ्यांवर टीका करू नका, असे सांगितले आहे. प्रत्येक जात आणि धर्माचा सन्मान प्रत्येकाने करायला हवा. संघात देखील अस्पृश्यतेला स्थान नाही.

97 वर्षापूर्वी याच नागपूरच्या धर्तीवर एक राष्ट्रीयताने भरलेली गंगा अवतरी झाली होती. त्याला इतिहास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने ओळखते आणि मानतात. परंतु, ब्रिटिश काळामध्ये 1936  मध्ये इंग्रजांनी संघावरती बंदी  आली होती. पण, संघ त्या अडचणींना पार करून पुढे गेला. 1948 मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप लावून संघावरती बंदी घालण्यात आली. पण, सरकार काही सिद्ध करू शकले नाही. जे नेता सांगतात ते खोटे सांगतात नेत्यांना खोटं बोलण्याची सवय झाली आहे म्हणून ते खोटे बोलतात. त्यांना काही झालं तर संघाच्या नावावर ती शिवीगाळ करण्याचा एक फोबीया झाला. आज एकीकडे राजकीय नेते समाजाला वाटण्याचे फोडण्याचे कार्य करत असताना दुसरीकडे संघ सर्वांना जोडण्याचे कार्य करत आहे. तरीदेखील सध्या संघाला शिव्या देण्याचा फोबिया अनेकांमध्ये दिसून येतो, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.

इंदिरा गांधीच्या मनात आलं की चीन सारखं मी जन्मभर प्रधानमंत्री बनेल. त्यामुळे संघावरती इंदिरा गांधींनी बंदी आणली. लोकतंत्र आणि संविधानाचा गळा घोटला आणि संघावरती बंदी टाकली. लोकतंत्र आणि संविधानाच्या संरक्षणासाठी स्वयंसेवक जेलमध्ये गेले, असेही इंद्रेश कुमार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवकचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीयव्यवस्थेवर महत्वपूर्ण टीप्पणी केली होती. समाजाने वर्ण, जातीव्यवस्था विसरून जायला पाहिजे. हा भूतकाळ होता. आपल्या शास्त्रांना जातीय विषमता मुळीच मान्य नाही सामाजिक समरसता हा आपला परंपरेचा भाग होता. त्यामुळे जातीभेदाचे समर्थन कधीही करता येणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस