Ravi Rana | Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

अधिवेशात उद्धव ठाकरेंनी गोंधळ करू नये, रवी राणा याची जहरी टीका

खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंचं नाव ‘बापू’ आहे. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे म्हणजे ‘पप्पू’ आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. याच दरम्यान, आजपासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. याच अधिवेशनासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार आदित्य ठाकरेही नागपूरला गेले आहेत. अधिवेशनासाठी ठाकरे- पिता पुत्र गेले असता. त्यावरच आता अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले रवी राणा?

आपल्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ जारी करत रवी राणा यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यात ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या लोकांना न्याय देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी विदर्भात अधिवेशन आयोजित केलं. या अधिवेशनात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हजर राहत आहेत. खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंचं नाव ‘बापू’ आहे. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे म्हणजे ‘पप्पू’ आहे. हे दोघंही विदर्भाच्या धर्तीवर अधिवेशनासाठी येत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, अधिवेशन पूर्णपणे व्यवस्थित चालू द्यावं. कुठल्याप्रकारचा गोंधळ करू नये. तुमच्या हाती सत्ता दिल्यानंतर तुम्ही जे करू शकले नाहीत, ते खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस करत आहेत,” अशी टीका रवी राणांनी केली.

रवी राणा पुढे म्हणाले की, “आज सुनील प्रभू सभागृहात बोलले की, मंत्रिमंडळासाठी बांधलेल्या बंगल्यांची साफ-सफाई करण्यासाठी मोठा खर्च केला. अरे तुम्ही कधी विदर्भात अधिवेशन घेतलं नाही. तुमचे मंत्री कधी इकडे आले नाहीत. तुम्ही कधी त्या बंगल्यांमध्ये थांबले नाहीत. तुमची अडीच वर्षाची धूळ साफ करणं गरजेची होती, म्हणून सगळे बंगले स्वच्छ केले. आता याठिकाणी अनेक मंत्री थांबून विदर्भातील जनतेला न्याय देण्याचं काम करत आहेत,” असा टोला रवी राणांनी लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक