राजकारण

८ हजार किलो मटण, चिकन व असंख्य अंडी 'या' भाजप आमदाराची आखाड पार्टी चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांचे टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चंद्रशेखर भांगे | पिंपरी : भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी तब्बल १ लाख ३७ हजार लोकांना ८ हजार किलो मटण, ८ हजार किलो चिकन व असंख्य अंडी याचे जेवण देऊन आखाड पार्टी साजरी केली आणि भारतीय जनता पक्षाच्या नव्या संस्कृतीचा पायंडा पाडला आहे. अशा पार्ट्यांसाठी इतका मोठा पैसा येतो कुठून ? की जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी उपस्थित केला आहे. 

रविकांत वरपे यांनी म्हटले आहे, की एवढ्या मोठ्या प्रमाणात मांसाहार करण्यासाठी १ लाख ३७ हजार लोकांना आखाड पार्टीचे जेवण दिले आहे. या माध्यमातून त्यांनी भाजपच्या नव्या संस्कृतीला सुरुवात केली आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस विकासाच्या पोकळ गप्पा मारत असतात आणि इकडे त्यांचेच आमदार महेश लांडगे लोकांना मटन, चिकन, अंडी खाऊ घालत आहेत. एवढा मोठा खर्च कशाच्या माध्यमातून केला जातो.

एक साधा आमदार एक लाख ३७ हजार लोकांना कसे काय जेवण घालू शकतो ? त्याला ते कसे काय परवडते ? एवढा पैसा आला कुठून ? साध्या साध्या व्यवहारांची चौकशी करणारी ईडी एवढ्या मोठ्या जेवणावळीची चौकशी करणार आहे का ? की भाजपच्या लोकांना हे सर्व माफ असते, असा सवाल रविकांत वरपे यांनी केला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात पाणी प्रश्न, कचरा प्रश्न, कोयता गॅंगची दहशती यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना महेश लांडगे मात्र कार्यकर्त्यांना मटण, चिकन, अंडी खाऊ घालण्यात व्यस्त आहेत. मग पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची विकासाची समस्या कधी सुटणार आहे? असा प्रश्नही वरपे यांनी केला. आखाड पार्ट्यांची भारतीय जनता पार्टीची नवी संस्कृती उदयास आली आहे काय? असा सवालही रविकांत वरपे यांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा