Ravindra Chavan : विरोधकांच्या मोर्चावर रविंद्र चव्हाणाचे खोचक वक्तव्य Ravindra Chavan : विरोधकांच्या मोर्चावर रविंद्र चव्हाणाचे खोचक वक्तव्य
राजकारण

Ravindra Chavan : विरोधकांच्या मोर्चावर रविंद्र चव्हाणाचे खोचक वक्तव्य म्हणाले की, "महाविकास आघाडी बिघडी...."

आज भाजपने मुंबईमध्ये मुक मोर्चा काढला. यावेळी अनेक नेते या मोर्चाला उपस्थितीत होते. यावेळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाणांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • राज व उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर रविंद्र चव्हाण यांची सडकून टीका

  • आज भाजपने मुंबईमध्ये मुक मोर्चा काढला.

  • यावेळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाणांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.

Ravindra Chavan On MVA MNS Mumbai Morcha : आज भाजपने मुंबईमध्ये मुक मोर्चा काढला. अनेक नेते या मोर्चाला उपस्थितीत होते. यावेळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाणांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी ते म्हणाले की, "काँग्रेस सारख्या महत्वाच्या पक्षाने या मोर्चातून अंग काढून घेतले. गेल्या एक महिन्यातून त्यांच्याकडून काय करायचं आहे याबाबत भूमिका स्पष्ट नाही. महाविकास आघाडी बिघडी आहे. त्याच्या अडीच वर्षाच्या कारभारात एक कॉमन अजेंडा ठेवला, त्यात सुद्धा काम करत असताना अडीच वर्षांत यांनी काढीत एक मताने कोणता निर्णय घेऊ शकले असतील जे आवश्यक आहे ती भूमिका समोर घेऊन गेले असतील तर पाहा त्यावेळचे असणारे नेतृत्वामुळे, ही सर्व मंडळी विशेष मंडळी ठाकरे बंधू फार मोठे नेते, परंतु त्यांच्या मानसिकता लक्षात घ्या, वर्षानुवर्षे जनतेला भावनिक आव्हान करून जनतेला गुरफटून ठेवलं,महाराष्ट्र आणि त्याची अस्मिता यावर फक्त त्यांनी भाषण केली, वक्तृत्वावर असलेल्या कमांडच्या जोरावर ठाकरेंनी महाराष्ट्राला वाईट दिवस दाखवले. देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीतल्या लोकांना घर दिले मात्र पत्रा चाळीतील लोकांनी तुमच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या लोकांनी अडकवून ठेवले.

यावेळी ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनतेची दिशा भूल करणारा मोर्चा, हा मोर्चा विरोधकांचा समजू नका. ज्यावेळी महायुती सरकार महाराष्ट्राला गतिमान करण्याचा पर्यंत होतो, त्यावेळी काही NGO मोठी फडिंग करून महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, सचिन वाझे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष असताना काढला होता, काही NGO विरोधकांना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करताय."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा