थोडक्यात
'शिवसेना अजिबात अस्वस्थ नाही'
'ताकदीचे लोक शिवसेनेला लागत नाही'
भाजपच्या ऑपरेशन लोटसवर रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया
(Ravindra Dhangekar ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचं टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत असून पक्षांतर्गत भाजपच्या ऑपरेशन लोटसवर दोन्ही नेत्यांची नाराजी असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपमध्ये मेगाप्रवेशामुळे पक्षांतर्गत बैठकांचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत असून या मोठ्या मेगा प्रवेशांमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले की,
"आम्हाला बघितल्यावर वाटतं का? अस्वस्थ असल्यासारखे, आम्ही अजिबात अस्वस्थ नाही. शिवसेनेमध्ये लढणारी लोकं आहेत. ती लढत राहणार. सर्वसामान्यांना चेहरा देणारी शिवसेना आहे. शिवसेनेला ताकदीची लोकं लागत नाही. लढणारा कार्यकर्ता लागतो." असे रविंद्र धंगेकर म्हणाले.