राजकारण

राजापूर ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाला दणदणीत यश

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांची आमदार डॉ.राजन साळवीच्या पाठीवर कौतुकाची थाप

Published by : Sagar Pradhan

निसार शेख|चिपळूण: राजापूर,लांजा व साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे उपनेते आ.राजन साळवींच्या नेतृत्वाखाली अपेक्षेप्रमाणे दणदणीत यश मिळाले असुन याचपार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांनी आमदार डॉ.राजन साळवी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. राजापूर विधानसभा मतदार संघातील एकून ५३ ग्रामपंचायतीपैकी ३५ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवित आपले वर्चस्व कायम राखले तर उर्वरीत १८ ठिकाणी गाव पॅनल, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने आपल्या जागा जिंकल्या आहेत. लोकसभा, विधानसभा, पं.स.व जि.प.च्या प्रत्येक निवडणूकीत या २६७-राजापूर विधानपानेला सभा मतदारसंघात शिवसेनेने सातत्याने आपले वर्चस्व सिध्द करीत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सिध्द केले आहे. दरम्यानच्या झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणूकीप्रमाणे या वेळीही शिवसेनेने गाव पॅनलसहित इतर सर्व विरोधकांना स्वतःच्या जवळपासही फिरकू न दिल्याचे चित्र ग्रामपंचायतीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

राजापूर तालुक्यात एकुण ३१ ग्रा.पं.साठी मतदान झाले होते व याठिकाणी शिवसेना[उध्दव बाळासाहेब ठाकरे] १७, भाजप ३,गाव पॅनल ४,कॉंग्रेस ३,मनसे १,राष्ट्रवादी १ व शिंदे गट २ विजय मिळवला आहे. लांजा तालुक्यामध्ये तर शिवसेना [उध्दव बाळासाहेब ठाकरे] पक्षाने विरोधकांना चांगलाच शह देऊन करताना एकुण १९ ग्रा.पं.पैकी १५ ठिकाणी शिवसेनेचे पॅनल बसवले व २ ठिकाणी गाव पनवेल तर २ ठिकाणी भाजपा विजयी झाले आहे. यावेळी लांजा तालुक्यात शिवसेनेला दोन नवीन ग्रा.पं.वर आपले वर्चस्व सिध्द करण्याची संधी मिळाली. तर दाभोळे (साखरपा) जि.प.गटात ३ ग्रा.पं.पैकी ३ ठिकाणी शिवसेना विजयी झाली असुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व सिध्द केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...