BEST credit society polls Result 
राजकारण

BEST credit society polls Result : भाजप की ठाकरे बंधू? बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज निकाल

9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बेस्ट कामगारांच्या पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली.

Published by : Team Lokshahi

(BEST credit society polls Result) 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बेस्ट कामगारांच्या पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी उत्साहात पार पडली. पावसाचा अडथळा न मानता तब्बल 83 टक्के सभासदांनी मतदान करून या निवडणुकीबद्दलची उत्सुकता अधोरेखित केली. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची ही निवडणूक केवळ पतपेढीपुरती मर्यादित नसून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.

या निवडणुकीला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व मनसे यांनी हातमिळवणी करून उभे केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’ आणि भाजप समर्थित श्रमिक उत्कर्ष सभा तसेच समर्थ बेस्ट कामगार संघटना यांच्यात थेट लढत झाली. प्रचारादरम्यान वातावरण चांगलेच तापले आणि ही लढत अखेर ठाकरे बंधू विरुद्ध भाजप अशी रंगली.

सोमवारी सकाळी 9 पासून मतदानास सुरुवात झाली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात आली होती. संध्याकाळपर्यंत 83 टक्के सभासदांनी मतदान करून विक्रमी सहभाग नोंदवला. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा