Rohini Aacharya Team Lokshahi
राजकारण

Rohini Aacharya : सत्तेचा भुकेला पक्ष म्हणत, रोहिणीचा भाजपवर हल्लाबोल....

Published by : prashantpawar1

बिहारमध्ये जेडीयू-भाजप युती तुटल्यानंतर नितीश कुमार(Nitish Kumar) महाआघाडीसोबत सरकार स्थापन करणार आहेत. अशा स्थितीत राजकीय प्रतिक्रिया आणि प्रतिहल्लाचा फेरा सुरूच आहे. ताज्या प्रकरणात लालू प्रसाद यादव(Lalu Prasad Yadav) यांची कन्या राहिणी आचार्य(Rohini Aacharya) हिने भाजपवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही सरकार पाडलं तर मास्टर स्ट्रोक आणि आम्ही उभं केलं तर देशद्रोही? असं ट्विट करत तिने म्हटलेलं आहे.

तुमची भावना खरी आणि आमची खोटी, तुम्ही सरकार पाडाल तर मास्टर स्ट्रोक अन आम्ही समाजवादी सरकार बनवले तर देशद्रोही हे सर्व कशाबद्दल आहे ? गरीबांच्या राज्याला तुम्ही जंगलराज म्हणता आणि तुमच्या राक्षसी राजाला मंगलराज म्हणता असा देखील टोला तिने लगावला. रोहिणी यांनी यापूर्वीही भाजपवर हल्लाबोल केला होता.

भाजपला सत्तेची भूक असल्याचं सांगितलं

रोहिणी आचार्य यांनी भाजपवर निशाणा साधताना काही दिवसांपूर्वी भाजपची सत्तेची भूक एक दिवस बुडणार असल्याचे ट्विट केले होते. याशिवाय राज्याभिषेकाची तयारी करा कंदीलधारक येत असल्याचं तिने सांगितलं. नितीश कुमार महाआघाडीत सामील होण्यापूर्वी रोहिणी यांनी ट्विट केले होते. राजकीयदृष्ट्या लालूंची मुलगी रोहिणी ट्विटर आणि फेसबुकवर नेहमीच सक्रिय असते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका