राजकारण

Rohit Pawar : रोहित पवार यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट; म्हणाले...

रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. भेटीसाठी नितिन गडकरी यांच्या निवासस्थानी रोहित पवार दाखल झाले होते. नितिन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बऱ्याचवेळ चर्चा झाली. पण ती सर्व चर्चा विकासकामांवर जास्त होती. माझ्या मतदारसंघामध्ये दोन मोठे नॅशनल हायवे, तसेच एक आता सिक्स लेन, सुरत - चेन्नईचा नॅशनल हायवे त्याबद्दलची चर्चा व मतदारसंघातले विषय हे मी त्यांच्याशी बोललो. नेहमी ते मदत करत असतात.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, फार कमी नेते असे असतात जे विरोधातल्या एका आमदाराला, नेत्याला मदत करतात. त्यात एक गडकरी साहेब येतात. त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. असे रोहित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...