Rohit Pawar Team Lokshahi
राजकारण

छत्रपती संभाजीनगर न म्हणता मुख्यमंत्री म्हणाले औरंगाबाद; रोहित पवार चूक दाखवत म्हणाले...

वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलचा आज शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती देतांना मुख्यमंत्री शिंदे छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हणाले.

Published by : Sagar Pradhan

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानंतर ठाकरे सरकराच्या काळात शहराचे नाव संभाजीनगर करण्यात आले. मात्र, त्यानंतर राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आले. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. त्यावेळी या नामकरणावरून प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, दरम्यान आता मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हंटले आहे. एका कार्यक्रमाची माहिती देतांना त्यांनी ट्विटरवर छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हंटले आहे. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनी चूक लक्षात आणून देत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

मुख्यमंत्र्यांची चुकी लक्षात आणून देतांना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय. ती आपण दुरुस्त कराल, ही अपेक्षा! असे ते यावेळी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट