राजकारण

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत जाणार?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अजून एक मोठी माहिती समोर येत आहे ती म्हणजे रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काल रात्री रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. रात्री उशिरा दोघांमध्ये भेट झाल्याची चर्चा रंगली आहे.

रूपाली चाकणकर या महिला आयोगाचे अध्यक्ष आहे. यापूर्वी राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य असलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची जोड उठवली जायची. विशेषतः भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याकडून रूपाली चाकणकर यांच्यावर नियमितपणे शाब्दिक हल्ले केले जात होते. आता रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या सोबत गेल्या तर त्यांच्या अडचणी कमी होऊ शकतात. असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत जाणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती