राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचं आवाहन केलं आहे. पोस्ट करत रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, मा.आमदार रवी भाऊ आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पण विचार करू शकता की, मा.आमदार श्री.रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते,सक्षम लोकप्रतिनिधी. निवडणुकीत हार जीत चालतच असते. नेतृत्व,कामाची पद्धत थांबत नसते. भाऊ तुझ्या सोबत काम केले आहेच.
काही दिवस बातमी येत आहे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे. कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार आहात, कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात. रवी भाऊ मा.अजित दादांचे आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहे ते तू अनुभवले आहेत.
तुझ्यासारखे काम करणारा,सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाचा कार्यकर्ता, लोकप्रनिधिनी नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती असेल. बाकी पक्ष वेगळे असले तरी हाडाचे कार्यकर्ते, काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी बहीण भाऊ नाते कायम आहेच. असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.