राजकारण

नावातच 'गु' असलेले लायकीचे नसलेले...; रुपाली ठोंबरेंचे गुलाबराव पाटलांवर टीकास्त्र

शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी चुकीचा उल्लेख केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी चुकीचा उल्लेख केला आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली आहे.

रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या की, नावातच गु असलेले लायकीचे नसलेले ईडी सरकार मधील मंत्र्याचे सातत्याने विरोधी पक्षातील पुरुषांना आणि आता महिलांना, भगिनींना अपमानास्पद बोलणे, खोट्या कारवाई करण्याच्या विरोधात आम्हा माता भगिनींना रस्त्यावर उतरून तोंड काळे करावे लागणारच यांना महाराष्ट्रात फिरू दयायचे नाही, असा इशारा त्यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?