थोडक्यात
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर
रुपाली ठोंबरे पाटील भेट घेण्याची शक्यता
(Rupali Thombre Patil) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामधून रुपाली ठोंबरे पाटील यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील या नाराज झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
यातच आता अजित पवार हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी रुपाली ठोंबरे पाटील या अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील या आपला पुढील निर्णय जाहीर करण्याची शक्यता असून रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील हा राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुण्यात पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत असून मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.