राजकारण

‘ईव्हीएम’बरोबर सत्तापक्षाने निवडणूक आयोगालाच ‘हॅक’ केले; सामनातून भाजपावर टीका

निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळते.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळते. यावर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल बोलत भाजपावर आरोप केले जातात. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामनातून म्हटले आहे की, ‘सत्यमेव जयते’ हेच आपल्या देशाचे बोधवाक्य आहे. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते लाव्हय़ाप्रमाणे उसळून वर येतेच. भाजपच्या वॉशिंग मशीनमधील मोदी साबणाची चर्चा जगभर सुरू आहे. त्यात भर घातली आहे ती भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी. त्यांनी बेशकपणे, निर्भयपणे सांगितले की, ”मतदारहो, तुम्ही कोणतेही बटन दाबा, मत भाजपलाच जाणार. आएगा तो मोदी ही…” याचा सरळ अर्थ असा की, भाजप ‘ईव्हीएम’ घोटाळा करून लोकसभा निवडणुका जिंकत आहे.निवडणूक आयोगात ‘गुजरात मॉडेल’चे अधिकारी आणून त्यांच्याकडून हवी ती बरी-वाईट कामे करून घेतली जातात. महाराष्ट्रात ज्या प्रकारे शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाच्या हातात दिले, त्यामुळे या मनमानीवर शिक्कामोर्तब झाले.

तसेच ‘ईव्हीएम’ विश्वासार्ह व समाधानकारक नाही हे सिद्ध झाल्यावरच हा निर्णय घेतला, पण विश्वासार्ह नसलेल्या ‘ईव्हीएम’ जनतेचा विश्वास गमावलेल्या मोदी सरकारने सुरूच ठेवल्या. हेच खरे गौडबंगाल आहे व हा भंगार माल का वापरला जातोय ते भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी आता स्पष्ट केले. ‘ईव्हीएम है तो मोदी ही आयेगा’ यावर मोहोर उठवून देशभरातील अंधभक्तांनी ‘ईव्हीएम चालिसा’चे पठण सुरू केले. जगातील अमेरिका, युरोप, जपान, जर्मनी, बांगलादेश, फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी तेथील निवडणूक प्रक्रियेतून ‘ईव्हीएम’ पद्धत मोडीत काढली.

‘ईव्हीएम’ हॅक करून विजय संपादन करणे हेच भाजपचे सूत्र असल्याचे भाजपचे खासदार सांगत असतील तर भारताचा निवडणूक आयोग यावर काय पावले उचलणार आहे? खरे तर निवडणूक आयोगाकडूनही आता कोणत्याच अपेक्षा ठेवता येणार नाहीत. कारण ‘ईव्हीएम’बरोबर सत्तापक्षाने निवडणूक आयोगालाच ‘हॅक’ केले आहे. निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही. भाजपच्या पेंद्रीय सरकारचा तो हरकाम्या बनला आहे.‘ईव्हीएम’द्वारे घेतलेल्या निवडणुकांत घोटाळाच घोटाळा असल्याचे त्याने सिद्ध करताच त्या भारतीय नागरिकास अटक केली. प्रश्न इतकाच आहे की, आता भाजपचेच खासदार डी. अरविंद कुमार यांनीही तेच सत्य सांगितले! त्यांचे हे सत्यकथन म्हणजे ‘ईव्हीएम’ घोटाळ्यावर शिक्काच आहे! मग आता काय करणार? अरविंद कुमारना ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवा. त्यांनी सत्य, सत्य आणि सत्य सांगितले आहे. असे सामनातून म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!