राजकारण

मोदींचा व्हिडीओ पोस्ट करत कॉंग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर; मुलाखत पंतप्रधानांची घेतात तशी हवी

Uddhav Thackeray Interview वरुन चित्रा वाघ यांची टीका; सचिन सावंतांचे प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली. यामध्ये उध्दव ठाकरेंनी शिंद गटासह भाजपवर शरसंधान साधले. या मुलाखतीवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शहाजीबापू पाटील यांच्या स्टाईलमध्ये टीका केली आहे. तर, या टीकेला कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उध्दव ठाकरेंच्या रोखठोक मुलाखतीवरुन चित्रा वाघ यांनी काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत. कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के, असा टोला शिवसेनेला लगावला आहे.

यावर सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुनी मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे. बरोबर आहे, मुलाखत पंतप्रधानांची घेतात तशी हवी. काय ते देशहिताचे प्रश्न, काय ती जनहिताची उत्तरे, काय ती पंतप्रधान निवासातील मुलाखत, राष्ट्रीय कार्यक्रम एकदम ओक्के, असा निशाणा सचिन सावंतांनी साधला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची मुलाखत खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने घेतली होती. यात अक्षय कुमारने मोदींना तुम्ही आंबा खाता का? खात असतील तर कापून खातात की चोखून खातात, असा प्रश्न विचारला आहे. यावर मोदी हसताना दिसत आहे. ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून टीकेची झोड उठली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?