राजकारण

ठाकरे, राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळायला लावलं; सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

सदा सरवणकर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर, सदा सरवणकर यांनी संजय राऊतांबद्दलही मोठा दावा केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : उध्दव ठाकरे, संजय राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळायला लावलं, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. उध्दव ठाकरेंच्या सांगण्यावरून जोशींच्या घरावर हल्ला केला, असेही त्यांनी म्हंटले आहे. सदा सरवणकर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर, सदा सरवणकर यांनी संजय राऊतांबद्दलही मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले सदा सरवणकर?

आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांचे घर जाळायला लावले, असा गौप्यस्फोट सदा सरवणकर यांनी केला. मला मनोहर जोशींनीच मातोश्रीवर उमेदवारी मागायला ताकद दाखवण्यास सांगितले होते. मात्र, मनोहर जोशी यांनीच उमेदवारी कापली, असे सांगत त्यांच्या घरावर हल्ला करायला सांगितले, असा उद्धव ठाकरे यांचा निरोप मला मिलिंद नार्वेकर यांनी दिला.

तर, संजय राऊत यांनी जाताना पेट्रोल पंप लागतो. तिथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका. काही शिल्लक ठेऊ नका, असा फोन केला होता. त्यामुळे मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केल्याची जाहीर कबुली सदा सरवणकर यांनी कोल्हापुरात दिली. जाळ्यात अडकवून उमेदवारी नाकारायचे काम उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एवढंच नाही तर राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्राचे भले होईल असे वक्तव्य मनोहर जोशी यांनी केल्याने त्यांना दसरा मेळाव्यात येऊ दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील तरतुदी, न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदळाची पेज; जाणून घ्या फायदे

Sanjay Raut On IND-PAK Match : पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं' भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचा संताप

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा