राजकारण

त्या ‘चोर मंडळा’तील एक मोदी लंडनच्या पार्टीत; सामनातून हल्लाबोल

भारताचे माजी जनरल सॉलिसिटर आणि ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांनी तिसरं लग्न केलं.

Published by : Siddhi Naringrekar

भारताचे माजी जनरल सॉलिसिटर आणि ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांनी तिसरं लग्न केलं. या लग्नात ललित मोदीनेसुद्धा उपस्थिती लावली होती. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

सा हा देशाचा भगोडा लंडनमध्ये कायदेपंडित हरीश साळवे यांच्या मेजवानीत दिसतोय व त्याच हरीश साळवे यांना ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीत माजी राष्ट्रपती व गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबरीने स्थान मिळाले. याचा अर्थ असा की, भ्रष्टाचार उखडून काढू, परदेशात पळून गेलेल्या घोटाळेबाजांना फरफटत आणू, सर्व काळा पैसा परदेशांतून भारतात आणू या मोदींच्या फक्त थापाच थापा आहेत.

हरिश साळवे यांच्या विवाहाची ‘हॅटट्रिक’ केली. त्यांनी तिसरा विवाह केला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण साळवे यांनी त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या प्रीत्यर्थ जी मेजवानी दिली त्यात श्रीमान साळवे यांच्या सोबतीने हिंदुस्थानला हवा असलेला भगोडा ‘चिअर्स’ करताना दिसत आहे. यावर आता मोदी-शहांचे काय म्हणणे आहे? की तेही दिल्लीत बसून साळवे-ललित मोदी जोडीस ‘चिअर्स’ करणार आहेत?आज देशाचे चित्र काय आहे? मोदी शहांच्या माणसांबरोबर ‘भगोडा’ आरोपी ललित मोदी आरामात ‘चिअर्स’ करीत आहे. हा एक नवाच ‘सनातन धर्म’ भाजपने निर्माण केलेला दिसतोय. सगळेच चोर मोदी कसे?’ या एका विधानावर राहुल गांधी यांची खासदारकी मोदी सरकारने रद्द केली, त्यांचे घर काढून घेतले, त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या ‘चोर मंडळा’तील एक मोदी लंडनच्या पार्टीत ‘चिअर्स’ करताना संपूर्ण देशाने पाहिला.

भाजप विरोधकांना खोट्या प्रकरणांत गोवणाऱ्या देशातील तपास यंत्रणा आता काय भूमिका घेणार? की ललित मोदीलाही स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होणार? मोदी सरकारला पाकिस्तानातून दाऊदला आणता आलेले नाही आणि ‘भगोडा’ गुन्हेगार तसेच ज्याच्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी झाली आहे तो ललित मोदी समोर दिसत आहे, तोही केंद्र सरकारच्या वकिलांबरोबर ‘चिअर्स’ करताना. लोकांना मूर्ख बनविण्याचा हा धंदा आहे.राहुल गांधी यांनी ‘सर्व मोदी चोर कसे?’ हे विधान करताच साळवे दुःखी झाले. राहुल गांधी यांचे विधान असंसदीय असल्याचे सांगून साळवे यांनी मोदींची (पंतप्रधान) बाजू घेतली त्यामागचे इंगित आता उघड झाले. पंतप्रधान मोदी यांनी जो नवा अमृतकाल निर्माण केला त्या अमृतकालाचे विष करणारा हा प्रकार आहे. मोदी व शहा यांना आता ललित मोदी-साळवे संबंधांवर संसदेत उत्तर द्यावे लागेल. असे सामनातून म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा; गौतम अदानी म्हणाले की,...

Mohammed Nizamuddin : अमेरिकन पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Earthquake : रशियातील कामचटका येथे 7.8 तीव्रतेचा भूकंप; आता त्सुनामीचा इशारा

Latest Marathi News Update live : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी