राजकारण

...तर मुश्रीफांना परतवण्याची ताकद आमच्याकडे; फडणवीसांकडून घाटगेंची मनधरणी

हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसह सत्तेत प्रवेश केल्याने कोल्हापुरातील राजकारण सध्या तापले आहे. घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतल्याचे समोर येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सतेज औंधकर | कोल्हापूर : अजित पवार यांच्या शपथविधीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. याचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. हसन मुश्रीफ यांनीही अजित पवारांसह सत्तेत प्रवेश केल्याने कोल्हापुरातील राजकारण सध्या तापले आहे. यामुळे समरजित सिंह घाटगे चांगलेच नाराज झाले असून काल दिवसभर ते नॉट रिचेबल होते. यानंतर आता घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर येत आहे.

समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. घाटगे-मुश्रीफ वाद एवढ्या विकोपाला गेला की वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरु होते. परंतु, अजित पवार यांच्याबरोबर आमदार हसन मुश्रीफ यांनीही शिंदे-फडणवीसांना समर्थन देत मंत्रीपदही मिळविले. यामुळे समरजीत घाटगे यांना जोरदार झटका बसला असून यानंतर त्यांनी आपला फोन देखील बंद ठेवला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर अखेर समरजित घाटगे यांनी देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट घेतली आहे.

हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असला तरी तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. ते कुठे तुमच्या आडव्या आले आहेत. आले तर त्यांना परतवण्याची ताकद आमच्याकडे आहे, असा विश्वास देतानाच सध्याची विधानसभेची तयारी चालू ठेवा, असं आश्वासन फडणवीस यांनी समरजीत घाटगे यांना दिला आहे. त्यामुळे नाराज असलेले घाटगे पुन्हा एकदा गतीने काम करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : अशिष शेलार आणि जयंत पाटील यांची विधान परिसरात भेट

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार

MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला