राजकारण

Sambhaji Raje Chhatrapati : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती करणार दिल्लीवारी

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा पार पडत आहेत. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या केंद्रीय मागासवर्ग आयोगाची ते भेट घेणार आहेत. मराठा समाजातील अनेक मराठा पदाधिकाऱ्यांच शिष्टमंडळ घेऊन संभाजीराजे आयोगासोबत बैठक घेणार आहेत. उद्या दुपारी दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात बैठक पार पडणार आहेत. मराठा आरक्षणासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासाठी संभाजीराजे दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : शालेय पोषण आहारात नव्या मेनूची सुरुवात; विद्यार्थ्यांना मिळणार चविष्ट आहार

Crime News : चितेगावमध्ये मियाँभाईच्या खुनाची उकल; सहा आरोपींना पोलीस कोठडी

Birthday Celebration : ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा करताय ? मग थांबा ! सरकारने काढला नवा नियम

S. Jaishankar On Donald Trump : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्ट विधान; ट्रम्प यांचा दावा पुन्हा फेटाळला