Sandeep Deshpande Team Lokshahi
राजकारण

Sandeep Deshpande : बाळासाहेब कुठे आणि राज्यसभेसाठी दाढ्या कुरवाळणारे कुठे

संदीप देशपांडे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी पार पडणार असून यासाठी शिवसेना आणि भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एक अतिरिक्त उमेदवार दिल्याने भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात चुरशीची लढत आहे. येथे सहाव्या जागेवर विजयाची चावी २९ आमदारांच्या हातात आहे. यासाठी दोन्हीही पक्षांनी अपक्ष आमदारांचे मत आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी जोर लावला आहे. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मला आठवण येते की तत्त्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे बाळासाहेब कुठे. आणि ते एका राज्यसभेच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवाळणारे आमचे नंबर वन कुठे. संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार सगळे म्हणतात लवंगी वाचली तरी पुरे आहे, अशा शब्दांत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा होणार आहे. यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर राज्यातील विवध भागातून नागरिक येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा