Sandeep Kshirsagar | jaydatt kshirsagar  Team Lokshahi
राजकारण

बीडचं राजकारण तापणार, पुतण्याचे काकांवर गंभीर आरोप

आमदार संदीप क्षीरसागर पत्राद्वारे जयदत्त क्षीरसागर यांच्यावर कारवाई मागणी

Published by : Sagar Pradhan

बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होणार असल्याचे चिन्ह आता दिसत आहे. बीडमध्ये काका पुतणे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माजी मंत्री व आता शिवसेनेत असलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. जयदत्त क्षीरसागर हे संदीप क्षीरसागर यांचे काका आहेत. जयदत्त क्षीरसागर यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नवगत शिक्षक प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी चौकशीची मागणी केली आहे.

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नवगण शिक्षण संस्था असून याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कर्मचार्‍यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसूल करून मोठा भ्रष्टाचार केल्याने या कर्मचार्‍यांवर अन्याय झालेला आहे. या प्रकरणाची रितसर चौकशी करण्यात यावी व अन्याय झालेल्या या कर्मचार्‍यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे एका पत्राद्वारे जयदत्त क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे.

काय केले संदीप क्षीरसागर यांनी आरोप

नवगण शिक्षण संस्थेने प्रशासन चालवण्यासाठी एक असंवैधानिक समिती स्थापन केली असून समितीमध्ये डॉ.एस.एल.गुट्टे, डॉ.एस.एस.जाधव, डॉ.व्ही.टी.देशमाने या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेले कर्मचारी बीड येथील सौ.के.एस.के.महाविद्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असूनही महाविद्यालयात न थांबता दररोज वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थेअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांना तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दररोज भेटी देऊन तेथील कर्मचार्‍यांवर दबाव आणून प्रतिवर्षी मार्च एंडींग म्हणून एक पगार सक्तीने, दम देऊन वसूल करतात.

पैसे न दिल्यास आपली बदली करण्यात येईल, पदोन्नती रोखण्यात येईल, वेतनवाढी रोखण्यात येतील, रजा मंजुर करण्यात येणार नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. युजीसीकडून मिळणार्‍या विविध अनुदानात अपहार होत असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा