राजकारण

राहुल गांधी उध्दव ठाकरेंची भेट घेणार? संदीपान भुमरेंची बोचरी टीका, मातोश्रीवर...

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

छत्रपती संभाजी नगर : भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आता उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरेंनी जोरदार टीका केली आहे.

मातोश्रीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गेल्याने महाविकास आघाडी भक्कम होणार नाही. गाठीभेटीने महाविकास आघाडी भक्कम होत नाही त्यासाठी काम करावे लागत. राहुल गांधी हे अखिलेश यादव, रेड्डी यांना भेटल्याने काही फरक पडणार नाही. महाविकास आघाडीने कितीही नाटक केली तर काही फरक पडणार नाही. राहुल गांधी मातोश्रीवर गेल्याने काही महत्त्व वाढणार नाही. बाळासाहेब होते तेव्हा विषय वेगळा होता. आता हे स्वतः दुसरीकडे जातात म्हणून त्यामुळे मातोश्रीवर कुणी आलं काय आणि गेलं काय काही विषय नाही, असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावला आहे.

दरम्यान, जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांची नुकतीच राहुल गांधींसोबत भेट झाली होती. यानंतर उध्दव ठाकरे आणि राहुल गांधींची भेट होणार असून यादरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईत येणार असल्याचे समजते आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा